इलेक्ट्रिक गाड्या वापरण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे कंपन्या ग्राहकांना इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी विविध पद्धतीने मार्ग काढत आहेत. तर सध्या इलेक्ट्रिक स्कुटर बाजारात लॉन्च करण्यात येत आहेत. तर आता Gemopai Electric कंपनीने Gemopai Astrid Lite नावाची इलेक्ट्रीक स्कुटर लॉन्च केली आहे. या स्कुटरची किंमत 79,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
या स्कुटरमध्ये 2400 वॅटचे इलेक्ट्रिक मोटर आणि 1.7 kWh ची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. घरात एकदा चार्ज केल्यावर ही बॅटरी तुम्हाला काढता येणार आहे. त्यामध्ये 3 रायडींग मोड्स देण्यात आले आहेत. तर एकदा ही स्कुटर चार्ज केल्यास ती 75 ते 90 किमी पर्यंत धावणार आहे. मात्र कोणत्या रायडींग मोडवर स्कुटर ठेवण्यात आली आहे हे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. तसेच अतिरिक्त बॅटरी लावण्याचे ही ऑप्शन देण्यात आले आहे.(देशातील पहिली AI इनेबल इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; अवघ्या 4 हजारात घेऊन जाऊ शकता घरी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)
या नव्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये कलर एलइडी डिस्प्ले, एलइडी लाइट्स, की-लेस स्टार्ट आणि युएसबी पोर्ट देण्यात आले आहे. ऐस्ट्रिड लाइट या स्कुटरच्या पुढील बाजूस डिस्क आणि ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. चालकाच्या सेफ्टीसाठी साइट स्टॅन्ड सेंसर, अॅन्टी थेफ्ट सेंसर आणि इलेक्ट्रॉनिक असिस्च बेक्र सिस्टिम देण्यात आली आहे.