आपल्या घरासमोर एक चारचाकी उभी असावी असे प्रत्येकालाच वाटते. अनेकांचे तर कार घेणे हे मोठे स्वप्न असते. पण प्रश्न उद्भवतो तो म्हणजे बजेटचा. पण आता बजेटचा अधिक विचार करु नका. कारण काही कार तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध आहेत. 3 ते 5 लाखांदरम्यान उपलब्ध असलेल्या या काही कार्स...
मारुती सुझुकी आल्टो K10
आल्टो ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कार. आल्टो १० चा मायलेज 24.07 इतका आहे. तर याची किंमत 3.26 लाखांपासून ते 4.12 लाख रुपयांपर्यंत आहे.
डॅटसन रेडी गो
डॅटसन कारचे ऑटोमॅटिक वेरिएंट याचवर्षी लॉन्च करण्यात आले. या कारचा मायलेज 22.5 किमी आहे. तर किंमत 3.96 लाख इतकी आहे.
मारुती सुझुकी सिलेरेयो
सिलेरेयो या कारचा लूक अतिशय जबरदस्त आहे. कारचा मायलेज 23.1 किमी असून किंमत 4.49 ते 5.24 लाख रुपयांपर्यंत आहे.
रेनो क्विड
ही भारतातील बेस्ट सेलिंग कार आहे. क्विडचा एएमटी वेरिएंटचा मायलेज 24.4 किमी इतका असून किंमत 4.49 लाख रुपये आहे.
टाटा नॅनो
देशभरात चर्चेचा विषय ठरलेली कार म्हणजे टाटा नॅनो. नॅनोमध्ये 624 सीसी इंजिन असून या कारचा मायलेज 22 किमी प्रतिलिटर इतका आहे. 3.01 ते 3.20 लाख इतकी या कारची किंमत आहे.