General Motors च्या गाड्यांमध्ये उद्भवली मोठी समस्या; Chevrolet, Sierra Truck सह कंपनीने परत मागवल्या 6,24,000 गाड्या
Chevrolet Menlo sedan (Photo Credits: Twitter)

जर का आपण आपण जनरल मोटर्स (General Motors) पिकअप ट्रक किंवा युटिलिटी वाहन, बुइक सेडान (Buick Sedan) किंवा Chevrolet Malibu यांचे नवीनतम मॉडेल वापरत असाल तर आपल्याला डीलरकडे जाण्याची आवश्यकता भासू शकते. दिग्गज अमेरिकन ऑटोमेकर कंपनी जनरल मोटर्सने शेवरलेटसह एकूण 8.4 लाख वाहने परत मागवली आहेत. या सर्व वाहनांच्या चालकांनी फ्रंट सीटबेल्ट (Seatbelt Suspension Problems) मधील समस्येबद्दल तक्रार केली होती, त्यानंतर कंपनीने ही वाहने परत मागवण्याचा निर्णय घेतला. बेल्ट खराब झाल्यामुळे परत मागवलेल्या एकूण गाड्यांमध्ये 6,24,000 हजार युनिटचा समावेश आहे.

कंपनीच्या रिकॉलमध्ये पुढील मॉडेल्सचा समावेश आहे. –

2019-21 Chevrolet Silverado 1500

2019-21 GMC Sierra 1500

2020-21 Chevrolet Silverado 2500 and 3500

2020-21 GMC Sierra 2500 and 3500

2021 Chevrolet Suburban and Tahoe

2021 GMC Yukon XL

जीएमने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, सीट बेल्ट ब्रेकेट फ्रेममध्ये योग्य प्रकारे न बसल्याने ते सुरक्षित नाहीत. याचा अर्थ असा की अपघाताच्या वेळी हा पट्टा कारमध्ये बसलेल्या लोकांचे पूर्णपणे संरक्षण करू शकत नाही. मात्र कंपनीने हे देखील सांगितले आहे की, या तांत्रिक बिघाडामुळे कोणत्याही अपघाताची माहिती अजूनतरी मिळालेली नाही. या रिकॉलमध्ये 2012 आणि 2013 Buick Regal, 2013 Chevrolet Malibu आणि 2010 ते 2013 Buick Lacrosse midsize कार्सचाही समावेश आहे.

परत मागवलेली वाहने अर्ध्याहून अधिक राज्यात विकली गेली आहेत. यामध्ये कनेक्टिकट, डेलावेर, कोलंबिया जिल्हा, इलिनॉय, इंडियाना, आयोवा, केंटकी, मेन, मेरीलँड, मॅसॅच्युसेट्स, मिशिगन, मिनेसोटा, मिसुरी, न्यू हॅम्पशायर, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, ओहायो, पेनसिल्व्हेनिया, र्‍होड आयलँड, वर्माँट, व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. (हेही वाचा: Year Ender 2020: यंदाच्या वर्षात भारतात लॉन्च झाल्या 'या' दमदार SUV, जाणून घ्या अधिक)

कंपनीने सांगितले आहे की, रिकॉल केल्या गेलेल्या गाड्यांच्याबाबत त्यांच्या मालकांना कळवण्यात येईल. या वाहनांमधील समस्या विनामूल्य दुरुस्त करून दिल्या जातील.