बजाज स्कुटर्सची पहिली इलेक्ट्रिक टू व्हिलर 'चेतक' (Chetak ची पहिली झलक पाहिल्यानंतर त्याच्या लॉन्च बद्दल ग्राहकांच्या मनात कमालीची उत्सुकता होती. आता अखेर कंपनीकडून लॉन्च डेट जाहीर केली आहे. यंदा मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर 'चेतक' बाईक (Chetak Electric Scooter) लॉन्च होणार आहे. 14 जानेवारीला बाईक लॉन्च होणार आहे. त्याची एक्स शोरूम किंमत सुमारे 1.2 लाख इतकी असण्याची शक्यता आहे. पुणे (Pune) शहरापासून या बाईलच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. Bajaj कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर Chetak Launch; किंमत, मॉडेल आणि फिचर्सबाबत घ्या जाणून.
भारतभरामध्ये KTM dealerships च्या अंतार्गत चेतक बाईकची विक्री केली जाणार आहे. सुरूवातीला पुणे, मुंबई, दिल्ली, चैन्नई आणि बंगलोर मध्ये सुरूवातीच्या टप्प्यात विक्रीला सुरूवात होणार आहे. बाईक लॉन्च झाल्यानंतर तात्काळ भारतामध्ये त्याच्या विक्रीला सुरूवात होणार आहे. यामध्ये lithium-ion बॅटरीचा वापर केला जाणार आहे. तर एकदा इको मोड वर चार्ज केल्यानंतर स्कुटर 95 किमी पर्यंत चालणार आहे. स्पोर्ट मोड मधील बाईक 85 किमी पर्यंत चालणार आहे.
चेतक इलेक्ट्रिकच्या इतर स्पेसिफिकेशन बाबत कंपनीने अद्याप खुलासा केलेला नाही. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बजाज चेतक बनवली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या बाईकसाठी इटालियन स्कुटर कंपनीकडून प्रेरणा घेण्यात आली आहे. या बाईकमध्ये संपूर्ण बॉडी ही मेटलमध्ये असेल, एलईडी लाईट्स असतील, डिजिटल कंसोल असेल, साईड स्टॅड इंटिकेटर असेल, अलॉय व्हिल्स असतील, डिस्क ब्रेक्स आणि अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टी असतील.