Tata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकीनंतर टाटा मोटर्सनेही घेतला Passenger Vehicles च्या किमती वाढवण्याचा निर्णय, 19 जानेवारीपासून लागू होणार नवे दर
Tata-Motors (Photo Credit -PTI)

Tata Motors Cars Price Hike: मारुती सुझुकी (Maruti Suzuki) नंतर आता टाटा मोटर्सनेही (Tata Motors) नवीन वर्षात प्रवासी गाड्यांच्या (Passenger Vehicles) किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन किमती बुधवार, 19 जानेवारी 2022 पासून लागू होतील. टाटा मोटर्सने जाहीर केले आहे की, कंपनी 19 जानेवारीपासून त्यांच्या प्रवासी वाहनांच्या किमती सरासरी 0.9 टक्क्यांनी वाढवणार आहे. मॉडेल प्रकारावर कोणत्या वाहनांची दरवाढ अवलंबून असेल. तथापि, टाटा मोटर्सने 18 जानेवारी 2022 पूर्वी वाहने खरेदी करण्यासाठी बुक केलेल्या ग्राहकांवर दरवाढीचा परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. त्याच वेळी, टाटा मोटर्सने ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारे काही प्रकारांच्या किमती 10,000 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. (वाचा - Dual-Mode Vehicle: जपानने सादर केली जगातील पहिली ड्युअल-मोड बस; रस्त्यासह रेल्वे रुळांवरही धावणार (Watch Video))

टाटा मोटर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढत्या खर्चामुळे कंपनीला किंमत वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. वाढलेल्या खर्चाचा मोठा हिस्सा कंपनी स्वतः सहन करत आहे, परंतु काही भाग किमती वाढवून भागवला जात आहे. टाटा मोटर्सने 1 जानेवारी 2022 पासून त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles) किमती वाढवल्या आहेत.

यापूर्वी, मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) ने त्यांच्या अनेक मॉडेल्सच्या किमती 4.3 टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत. उत्पादन खर्चातील (Production Cost) वाढीचा भार अंशतः कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. कंपनीने आपल्या विविध मॉडेल्सच्या किमती 0.1 ते 4.3 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.