'ट्रायम्प' या ब्रिटीश कंपनीने तयार केलेली 2019 Triumph Speed Twin या नव्याने येणाऱ्या बाईकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच EICMA या एका कार्यक्रमाच्या वेळी कंपनी ही बाईक घेऊन येणार होते. मात्र सोशल मीडियावर याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर पाहायला मिळाला आहे.
2019 Triumph Speed Twin ही बाईक Triumph Bonneville T120 या बाईकच्या मॉडेलवरुन बनविण्यात आली आहे. तसेच 900 सीसी मॉडेलसारखे Speed Twin कास्ट व्हील या बाईकला देण्यात आले आहे. तर या कंपनीने Scrambler200 चे मॉडेल लंडनमध्ये घेऊन आले आहेत. मात्र स्पीड ट्विनबद्द अजून कोणती माहिती देण्यात आलेली नाही आहे. तर या नव्या बाईकचे लॉँचिंग नोव्हेंबरमध्ये मिलान येथे करण्यात येणार आहे.
परंतु मिळालेल्या माहितीनुसार Speed Twin भारतात लवकर लॉंच करणार आहेत. तसेच 2019 Triumph Speed Twin ही भारतात EICMA या कार्यक्रमाच्यानंतर सहा महिन्यांनी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.