2019 Tata Hexa लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Tata Hexa (Photo Credit- Twitter)

टाटा मोटर्स कंपनीने 2019 Hexa या नव्या एडिशनचे लॉन्चिंग केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Tata Hexa SUV ची भारतातील सुरुवातीची किंमत 12.99 लाख रुपये आहे. कारच्या हायर वेरिएंट्स मध्ये अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. XM, XMA आणि XM+ यात जुन्या 5.0 इंच स्क्रीनऐवजी 7.0 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. त्याचबरोबर 10 नवे JBL स्पीकर्स देण्यात आले आहेत. Tata Tiago XZ+ वेरिएंट मध्ये देण्यात आलेली इंफोटेनमेंट सिस्टम यात देण्यात आली आहे.

किंमती

   Hexa XE 4X2 (7 सीटर)    12.99 लाख रुपये
   Hexa XM 4X2 (7 सीटर)   14.38 लाख रुपये
   Hexa XM+ 4X2 (7 सीटर)   15.46 लाख रुपये
   Hexa XMA 4X2 (7 सीटर)   15.62 लाख रुपये
   Hexa XT 4X2 (6/7 सीटर)  17.03 लाख रुपये
   Hexa XTA 4X2 (6/7 सीटर)  18.19 लाख रुपये
   Hexa XT 4X4 (6/7 सीटर)  18.36 लाख रुपये

फिचर्स

2019 Tata Hexa मध्ये AC वेंट्स आणि इंफोटेनमेंट सिस्टमवर अॅडिशनल क्रोम सराऊंडिंग मिळेल. यात 2.2 लीटर डिझेलचे इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 156bhp पावर आणि 400Nm टॉर्क जनरेट करतं. या इंजिनात 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटीक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या टॉप वेरिएंट्समध्ये XT, XTA आणि XTA 4x4 मध्ये अधिक मोठे इंफोटेनमेंट सिस्टम दिले जात आहे. याशिवाय हायर स्पेक वेरिएंट्स मध्ये नवे ड्युअल टोन पेंट स्किम दिली आहे. ही कार दोन नव्या रिफ्रेशिंग कलरमध्ये उपलब्ध आहे- इन्फिनिटी ब्लॅक आणि टायटेनियम ग्रे.