Social Media Survey: मुलांपेक्षा मुलींना इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबचा वापर सोडणे अधिक कठीण! जाणून घ्या, सर्वेक्षण अहवाल!
सोशल मीडिया (Photo Credits-Twitter)

Social Media Survey: आज सोशल मीडियाने (फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टिकटॉक आणि यूट्यूब इ.) ज्या प्रकारे किशोरवयीन मुलांना वेड केलं आहे, त्यामुळे किशोरवयीन मुलांवर त्याचा जास्त परिणाम होतो हे सांगणे वावगे ठरणार नाही. सोशल मीडियाचे व्यसन सोडणे अवघड आहे, परंतु याबाबतचा नुकताच आलेला संशोधन अहवाल धक्कादायक आहे.  गेल्या 7-8 वर्षात सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीमध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनेकांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. दरम्यान, अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरकडून या संदर्भातील सर्वे करण्यात आला आहे. दरम्यान, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जाणून घ्या सविस्तर 

58% किशोरवयीन मुलींना वाटते सोशल मीडियाचा वापर थांबवणे अशक्य, जाणून घ्या सविस्तर 

अमेरिकेतील प्यू रिसर्च सेंटरने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, मुलींना इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, टिकटॉक आणि यूट्यूब (सोशल मीडिया) सोडणे मुलांपेक्षा (किशोरवयीन) अधिक कठीण आहे. सोशल मीडियाचा वापर  सोडण्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, 54 टक्के मुलांच्या मते आहे की, सोशल मीडिया सोडणे सोपे नाही, तर उर्वरित 46 टक्के मुलांच्मया  ते सोडले जाऊ शकते. मुलींना हा प्रश्न विचारला असता. सर्वेक्षणानुसार ५८ टक्के मुलींचा असा विश्वास आहे की, सोशल मीडिया सोडणे त्यांच्यासाठी सोपे नसेल.

दुसरीकडे, 25 टक्के मुले आणि 15 टक्के मुलींसाठी सोशल मीडिया सोडणे कठीण होणार नाही. एका सर्वेक्षण अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की, 15 ते 17 वयोगटातील प्रत्येक 10 व्या किशोरवयीन मुला-मुलींना हे सोशल मीडियाचा वापर सोडणे जास्त कठीण जाईल.

किशोरवयीन मुले सोशल मीडियावर किती वेळ घालवतात, जाणून घ्या 

किशोरवयीन मुले सोशल मीडियावर किती वेळ घालवतात असा प्रश्न विचारला असता, 55 टक्के यूएसमधील  किशोरांचा असा विश्वास आहे की, ते अॅप्स आणि साइट्सवर जास्त वेळ वाया घालवत नाही, तर 36 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की ते सोशल मीडियावर खूप वेळ घालवतात. तुम्हाला हे माहित असणे गरजेचे आहे की, सुमारे 95 टक्के तरुणांकडे स्मार्टफोन आहेत, 90 टक्के तरुणांकडे डेस्कटॉप किंवा लॅपटॉप संगणक आहेत, तर 80 टक्के तरुण गेमिंग कन्सोलचा वापर आहे.

गेल्या 7-8 वर्षात सोशल मीडिया अॅक्टिव्हिटीमध्ये 5 टक्के वाढ

दुसऱ्या एका सर्वेक्षणानुसार, 2014-15 मध्ये किशोरवयीन मुलांमध्ये इंटरनेटचा वापर 92 टक्के होता, तो आज 97 टक्के झाला आहे. एका अहवालात असेही समोर आले आहे की, गेल्या 8 वर्षांत किशोरवयीन मुलांचा स्मार्टफोन वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. संगणकाच्या तुलनेत टीन एजर्समध्ये स्मार्टफोनची उपयुक्तता वाढली आहे, असे म्हणायचे आहे.