Skullcandy Crusher Evo हेडफोन भारतात लॉन्च, जाणून घ्या खासियत

युएस बेस्ड ऑडिओ इक्विपमेंट कंपनी Skullcandy यांनी गुरुवारी भारतात एक नवे हेडफोन लॉन्च केले आहेत. त्यासाठी Crusher Evo असे नाव दिले असून त्याची सुरुवाती किंमत 12,999 रुपये आहे. हेडफोन 40 दिवसांच्या लॉन्ग बॅटरी लाइफसह येणार आहे. त्याचसोबत याच्या रॅपिड चार्ज टेक्नॉलॉजीचा सपोर्ट त्याला मिळणार असून ती 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 4 तासांचा प्लेबॅक टाइम देणार आहे.(फोन हरवल्यास किंवा खराब झाल्यास Important Contacts पुन्हा मिळवण्यासाठी काळजी करु नका, 'या' पद्धतीचा वापर करा)

हेडफोनवर पूर्णपणे मीडिया कंट्रोल असणार आहे. म्हणजेच युजर्सला थेट हेडफोनच्या सहाय्याने कॉल रिसिव्ह किंवा रिजेक्ट करता येणार आहे. त्याचसोबत आवाज सुद्धा कंट्रोल करता येणार आहे. या हेडफोनमध्ये गुगल, सीरि सारख्या वॉइस कमांडचा सपोर्ट दिला आहे. म्हणजेच युजर्सला स्मार्टफोनला टच न करता फोन ही कंट्रोल करता येणार आहे.

तसेच स्कलकँन्डीच्या या नव्या हेडफोनसाठी इन बिल्ड Tile फाइंडिंग टेक्नॉलॉजीचा सपोर्ट दिला आहे. त्यामुळे जरी तुमच्याकडे हेडफोन असल्यास आणि फोन विसरल्यास तुम्ही तो Tile च्या मदतीने शोधू शकणार आहात. त्याचसोबत फोन चोरी झाली तरीही माहिती मिळणार आहे. हे हेडफोन स्ट्रिटवियर इंस्पायर्ड केससह येणार आहे. हेडफोन नॉन ब्लुटुथ कनेक्टिव्हिटी Auxiliary केबलसह येणार आहे. Skullcandy Crusher Evo हेडफोन सहजपणे Skullcandy App सोबत कनेक्ट करता येणार आहे. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोर मधून तो अॅप डाऊनलोड करावा लागणार आहे.(Timex चा शानदार फिटनेस बँन्ड भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक)

कंपनीने नुकताच त्यांचा Skullcandy Spoke वायरलेस इअरबड भारतात लॉन्च केला होता. जो सिंगल चार्जमध्ये चार तासांची बॅटरी बॅकअप देणार आहे. त्याचसोबत या इअरबडच्या चार्जिंग केसमध्ये LED इंडिकेटर दिले आहे. तसेच इअरबडचा पूर्णपणे टच कंट्रोल दिला असून त्याची खरी किंमत 7999 रुपये आहे. मात्र ग्राहकांना ते लिमिटेड ऑफर अंतर्गत कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन फक्त 2999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.