Samsung Galaxy Tab A8 भारतात लॉन्च, जाणून घ्या स्मार्टफोनच्या किंमतीसह फिचरबद्दल अधिक
Samsung Galaxy Tab A8 (Photo Credits-Twitter)

सॅमसंग इंडियाचा नवा टॅबलेट गॅलेक्सी टॅब ए8 भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या टॅबलेटची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या टॅबमध्ये 10.5 इंचाची स्क्रिन आणि युनिसॉस टी618 प्रोसेसर दिला गेला आहे. या व्यतिरिक्त युजर्सला लेटेस्ट टॅबमध्ये 7400mAh ची बॅटरी मिळणार आहे. भारतीय बाजार उपलब्ध असलेल्या अन्य टॅबला कंपनीचा हा टॅब टक्कर देणारा ठरणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए8 अॅन्ड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. याच्या स्क्रिनचे रेजॉल्यूशन 1920 X 1200 पिक्सल आहे. या टॅबमध्ये ऑक्टा-कोर Unisoc T618  प्रोससर, 3 जीबी रॅम आणि 128 जीबचा इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. तो मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 1 टीबी पर्यंत वाढवता येणार आहे.(Samsug Galaxy S22 स्मार्टफोन सीरिज 'या' दिवशी होणार लॉन्च, जाणून घ्या अधिक)

यामध्ये ब्लूटूथ 5.0, वायफाय, जीपीएस, ग्लोनेस, 3.5 एमएम हेडफोन जॅक आणि युएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फिचर्स मिळणार आहेत. या व्यतिरिक्त टॅबमध्ये 7400 एमएचची बॅटरी दिली जाणार आहे. जी 11W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.

कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी टॅब ए8 च्या रियरमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि फ्रंट मध्ये 5 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला गेला आहे. या व्यतिरिक्त टॅबमध्ये डेटा सिक्युरिटीसाठी फेस अनलॉकची सुविधा आणि स्टेरियो स्पीकर्स मिळणार आहे.(Amazon Great Republic Day Sale: अ‍ॅमेझॉन घेऊन येत आहे ‘ग्रेट रिपब्लिक डे सेल’; 70 टक्क्यांपर्यंत सूट मिळवण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या ऑफर्स)

कंपनीने टॅबची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या टॅबची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 2 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. या नव्या टॅबला अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट, सॅमसंग ई-स्टोर आणि ऑफलाइन रिटेलच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. तर हे डिवाइस ग्रे, सिल्वर, पिंक आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होणार आहे.