व्हॉट्सअॅपसोबतच आता इतर अॅप्सचीही नोटिफिकेशन्स पहा आपल्या डेस्कटॉपवर
पुशबुलेट (Photo credit : Android Authority)

व्हॉट्सअॅप हे देशातील सर्वात जास्त प्रमाणात वापरण्यात येणारे मेसेजिंग अॅप आहे. आपण व्हॉट्सअॅपशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाही करू शकणार नाही. आता व्हॉट्सअॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. कारण पिंग झाल्यावर सारखे सारखे फोन पाहण्याची गरज नाही. मात्र आपल्या फोनमध्ये इतर अनेक असे अॅप्स आहेत ज्यांचे नोटिफिकेशन्स पाहण्यासाठी आपल्याला आपल फोन पहावाच लागतो.  मात्र असे एक अॅप आहे ज्यामुळे तुमच्या फोनवर आलेले मॅसेजेस, नोटिफिकेशन्स तुम्हाला तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर दिसणार आहेत.

या अॅपचे नाव नाव आहे पुश बुलेट. हे अॅप फक्त 3.5 एमबीचे आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर आणखी एक सेटिंग डेस्कटॉपवर करावी लागणार आहे. पुश बुलेट अॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला या अॅपवर  फेसबुक का गुगल अकाऊंटद्वारे जोडले जोडण्यासाठी विचारले जाते. त्यानुसार लॉग इन केल्यावर डेस्कटॉपवर जाऊन तेथील ब्राऊजरवर पुश बुलेटचे एक्सटेंशन अॅड करावे लागणार आहे. यानंतर या एक्टेंशनमध्ये जे मोबाईलच्या अॅपमध्ये लॉगिन आहे त्या अकाऊंटसारखेच लॉगइन करावे लागणार आहे.

या अकाऊंटमध्ये लॉग इन केल्यानंतर ब्राऊजरवर उजव्या कोपऱ्यामध्ये एक बुलेटच्या आकाराचा सिम्बॉल दिसेल. या सिम्बॉलवरच तुम्हाला तुंच्या फोनमध्ये आलेली नोटीफिकेशन समजतात. तसेच एखादा मॅसेज आला तर त्याला रिप्लाय देण्यासाठी नवी छोटी चॅट विंडोही उघडते.

या नोटिफिकेशन पाहण्याच्या फिचरसोबत मित्रांसोबत चॅट करणे तसेच तुमच्या फाईल्स कॉम्प्युटरला पाठवण्यासाठीही या अॅपचा फायदा होणार आहे.