प्रातिनिधिक प्रतिमा (फाइल फोटो )

Aadhar Card For Gas Cylinder:  घरगुती गॅस सिलिंडरची (एलपीजी सिलिंडर) कपात, गळती, वितरण न होणे ही एलपीजी ग्राहकांसाठी मोठी समस्या आहे. गॅस एजन्सींवर कडक कारवाई करूनही ग्राहकांच्या अडचणी संपत नाहीत. तथापि, तेल आणि वायू वितरण कंपन्यांनी आता क्यूआर कोडसह सुसज्ज सिलिंडर आणण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे, ज्याद्वारे ग्राहकांना संपूर्ण माहिती दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे.

पाहा व्हिडीओ:  

प्रत्येक एलपीजी सिलिंडरवर एक क्यूआर कोड असेल, याद्वारे सिलिंडर भरण्यापासून ते घरपोच वितरणापर्यंतची सर्व माहिती घरगुती ग्राहकांना उपलब्ध होईल. IOC च्या मते, QR कोड एका अर्थाने LPG सिलेंडरच्या आधार कार्ड सारखा असेल. यामध्ये एलपीजी सिलिंडर भरण्यापासून ते वितरणापर्यंतच्या सर्व नोंदी असतील. यावरून एलपीजी सिलेंडरमध्ये किती गॅस भरला किती कमी आहे याबद्दलची माहिती कळणार आहे. सिलिंडर भरताना त्याचे वजन किती होते. सिलिंडरची सुरक्षा चाचणी किती वेळा झाली. सिलिंडरच्या वितरकाकडून गॅस एजन्सीपर्यंतचा संपूर्ण तपशीलही QR कोडवरून उपलब्ध होईल. असा विश्वास आहे की 3-4 महिन्यांत QR कोडसह सुसज्ज LPG गॅस सिलिंडर भारतातील सर्व राज्यांमध्ये उपलब्ध होतील. दरम्यान, QR कोड सिलिंडरवर लावण्याची सुरवात झाली आहे.