Sanjay Manjrekar on Jadeja: रवींद्र जडेजाच्या फ्लॉप शोवर संजय मांजरेकर यांची तिखट प्रतिक्रीया; म्हणाले 'अपेक्षेनुसार खेळ...'

हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाची कामगिरी विशेष नव्हती. संपूर्ण सामन्यात जडेजाला फक्त एकच विकेट घेता आली.

Sanjay Manjrekar on Jadeja: रवींद्र जडेजाच्या फ्लॉप शोवर संजय मांजरेकर यांची तिखट प्रतिक्रीया; म्हणाले 'अपेक्षेनुसार खेळ...'
Ravindra Jadeja (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Sanjay Manjrekar on Jadeja: इंग्लंड दौऱ्याची सुरुवात टीम इंडियासाठी चांगली झाली नाही. हेडिंग्ले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला. इंग्लिश फलंदाजांनी शानदार कामगिरी केली आणि 371 धावांचे लक्ष्य गाठले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) वगळता भारतीय गोलंदाज दोन्ही डावात अपयशी ठरले. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ना चांगली फलंदाजी करू शकला ना त्याची गोलंदाजी काही खास होती. जडेजाच्या फ्लॉप शोमुळे माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर(Sanjay Manjrekar) खूप निराश दिसत होते.

जडेजाबद्दल मांजरेकर काय म्हणाले?

संजय मांजरेकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले, "प्रसिद्ध कृष्णावर जास्त टीका करू इच्छित नाही. प्रसिद्धला अजूनही त्याच्या गोलंदाजीत काही सुधारणा करायच्या आहेत. परंतु मी जडेजाच्या कामगिरीवर खूप निराश आहे. कारण ती शेवटच्या दिवसाची खेळपट्टी होती. जडेजासाठी खेळपट्टी चांगली होती. ज्याचा तो फायदा घेऊ शकला असता. हो, काही संधी होत्या. परंतु आम्हाला जडेजाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ही इंग्लंडच्या परिस्थितीनुसार खेळपट्टी नव्हती. मला वाटते की जडेजाने बेन स्टोक्सविरुद्ध खडतर खेळपट्टीचा योग्य वापर केला नाही. डकेटविरुद्ध बराच उशिरा आला. अनुभवी गोलंदाज आणि फलंदाजांकडून तुम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मला वाटते की जडेजाने त्याच्या खेळाने खूप निराश केले.

भारतीय गोलंदाजांना विकेटची आस होती. टीम इंडियाला 42 षटकांनंतर पहिली विकेट मिळाली. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. क्रॉली-डकेटच्या भागीदारीने टीम इंडियाला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले. 19 षटके टाकूनही बुमराहला एकही विकेट घेता आली नाही. सिराजची बॅगही रिकामी राहिली. कसोटी क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच फलंदाजांनी पाच शतके झळकावूनही एखाद्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा लज्जास्पद विक्रम आता टीम इंडियाच्या नावावर नोंदला गेला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 25, 2025 12:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).