सायन-पनवेल महामार्गावर मानखुर्द येथे बेस्ट बसचा अपघात, 65वर्षीय वृद्धाचा मृत्यू, चालक-वाहकासह अनेक प्रवासी जखमी
मुंबईतील मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बस दुभाजकाला धडकल्याने घडलेल्या भीषण अपघातात ६५ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून चालक, वाहकासह अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबईतील मानखुर्द परिसरातील सायन-पनवेल महामार्गावर २० जुलै रोजी सकाळी ९.१४ वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. मार्ग क्रमांक ५०१ ची बेस्ट बस नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. तर बसचे चालक, वाहक आणि काही प्रवाशांसह एकूण सात ते आठ जण जखमी झाले आहेत.
#WATCH | #Mumbai: Man Loses Life, BEST Driver & Conductor Injured After Bus Crashes Into Divider In Mankhurd; Traffic Hit On Sion-Panvel Highway
Reported by @ImAbhi5200 #Mumbai #Mankhurd #MumbaiNews #BESTBus pic.twitter.com/4iV2HlKdDe
— Free Press Journal (@fpjindia) July 20, 2026
(The above story first appeared on LatestLY on Jul 20, 2026 11:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

