महिला प्रीमियर लीग 2024 चा 16 वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा सात गडी राखून पराभव केला आहे. तत्पूर्वी, गुजरात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात जायंट्स संघाने 20 षटकांत सात गडी गमावून 190 धावा केल्या. गुजरात जायंट्सकडून दयालन हेमलताने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. मुंबई इंडियन्सकडून सायका इशाकने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 19.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. मुंबई इंडियन्सकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वाधिक 95 नाबाद धावांची खेळी खेळली. गुजरात जायंट्ससाठी ऍशले गार्डनर, तनुजा कंवर आणि शबनम एमडी शकील यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पाहा पोस्ट -
MUMBAI WINS! 🔥
HARMANPREET KAUR PLAYED CAPTAIN'S KNOCK!#TATAWPL | #MIvGG | #WPL2024 pic.twitter.com/uczlL3mV5H
— IPL Scoop (@Ipl_scoop) March 9, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)