DC (Photo Credit - X)

Lucknow Super Giants vs Delhi Capitals, 40th Match, Head-To-Head: टाटा आयपीएल 2025 चा 40 वा सामना आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (LSG vs DC) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लखनौमधील भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. लखनौ संघाचा हा नववा सामना असेल. लखनौ सुपर जायंट्सने आतापर्यंत स्पर्धेत 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. लखनौने शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. अशा परिस्थितीत, आज ते दिल्लीविरुद्ध सहावा विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. दिल्लीने 7 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 5 सामने जिंकले आणि 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्लीला शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला. LSG vs DC TATA IPL 2025 Live Streaming: आज लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामे; जाणून घ्या लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हेड-टू-हेड

आयपीएलच्या इतिहासात, लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स सहा सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. या सहा सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले. तरी दिल्ली कॅपिटल्सचे पारडे जड आहे. कारण ते पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या साथानावर आहेत. तर, लखनऊ सुपर जायंट्स पाचव्या स्थानावर आहेत.

हवामान अंदाज

सामन्या दरम्यान पावसाचा कोणताही व्यत्यय नसणार आहे. स्वच्छ वातावरणात संध्याकाळी 7.30 वाजता सामना पार पडेल. तापमान 27 ते 30° सेल्सिअस पर्यंत आरामदायक असेल. संपूर्ण सामन्यादरम्यान, कमी वारे आणि मध्यम आर्द्रता असेल.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपर जायंट्स: एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान.

अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार.