खेलो इंडिया युथ गेम्स 5.0 प्रथमच (Khelo India Youth Games 2023) मध्य प्रदेशात आयोजित करण्यात येणार आहे. भोपाळ, इंदूर, उज्जैन, ग्वाल्हेर, जबलपूर, मंडला, महेश्वर आणि बालाघाट या राज्यातील 8 शहरांमध्ये 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत सुरू होणाऱ्या या क्रीडा स्पर्धेत देशभरातील 7 हजारांहून अधिक खेळाडू 27 विविध खेळांमध्ये सहभागी होणार आहेत. खेलो इंडिया युथ गेम्सचे उद्घाटन 30 जानेवारी 2023 रोजी भोपाळमध्ये होत आहे. उद्घाटन सत्रासाठी प्रवेश नोंदणी करण्यात येत आहे. तुम्‍हालाही 'खेलो इंडिया युथ गेम्स'च्‍या उद्घाटन हंगामाचा भाग व्हायचे असेल तर नोंदणी लिंकवर क्लिक करून फॉर्म भरा आणि तुमची नोंदणी करा. नोंदणीची अंतिम तारीख 26 जानेवारी आहे. 27 आणि 28 जानेवारी रोजी तुम्ही टीटी नगर स्टेडियम, भोपाळ येथून तुमचा एंट्री पास गोळा करू शकता. एंट्री पाससाठी तुमचा ओळखपत्र पुरावा सोबत आणावे लागेल.

नोंदणीसाठी या लिंकवर क्लिक करा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)