यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे (Photo Credit: PTI, Twitter/IPL)

IPL 2021, RR vs CSK: यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शिवम दुबे (Shivam Dube) यांच्या तुफानी अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) अबू धाबी येथे चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 7 विकेटने धमाकेदार विजय मिळवला. चेन्नईने रुतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नाबाद 101 खेळीच्या जोरावर 179 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात राजस्थाने ओव्हरमध्ये जयस्वाल आणि दुबेच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धोनीच्या चेन्नई ‘आर्मी’ला पराभवाची धूळ चारली. रॉयल्ससाठी जयस्वालने 21 चेंडूत 50 धावा केल्या तर एविन लुईस (Evin Lewis) 27 धावा केल्या. याशिवाय दुबे 42 चेंडूत 60 धावा करून नाबाद परतला. तर कर्णधार संजू सॅमसनने 28 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, फलंदाजांनंतर चेन्नईचे गोलंदाज अपेक्षापूर्ती करू शकले नाही. सीएसकेसाठी (CSK) शार्दूल ठाकूरने दोन विकेट घेतल्या. तर के.एम असिफने एक गडी बाद केला. दरम्यान चेन्नईविरुद्ध या विजयासह राजस्थानने पॉईंट टेबलमध्ये चौथ्या/पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

चेन्नईने टॉस गमावून फलंदाजी करत रुतुराज गायकवाडचे नाबाद शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर  धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात राजस्थानसाठी जयस्वाल आणि लुईसच्या सलामी जोडीने चेन्नई गोलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. जयस्वाल आणि लुईसने आक्रमक पवित्रा घेत चार षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या षटकात जयस्वालने जोश हेजलवूडचा चांगलाच समाचार घेत षटकारासह 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण पुढील ओव्हरमध्ये ठाकूरने लुईसला 27 धावांवर हेजलवूडकडे झेलबाद करून संघाला पहिला धक्का दिला. लुईस पाठोपाठ पुढील ओव्हरमध्ये केएम आसिफने जयसवालला 50 धावांवर पॅव्हिलियनमध्ये पाठवले. मात्र नंतर कर्णधार सॅमसन आणि अष्टपैलू शिवम दुबेने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अखेरच्या क्षणी ठाकूरच्या चेंडूवर सॅमसन मोठा फटका खेळण्याचा मोह आवरू शकला नाही आणि सीमारेषेवर गायकवाडकडे कॅच आऊट झाला. यासह ठाकूरने सॅमसन आणि दुबे यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी 89 धावंची भागीदारी मोडली. अखेरीस दुबे आणि ग्लेन फिलिप्सने संघाचा विजय निश्चित केला.

यापूर्वी सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. संघासाठी राहुल तेवतियाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर चेतन सकारियाने चेन्नईच्या एका फलंदाजाला माघारी धाडलं. दुसरीकडे, चेन्नईसाठी गायकवाडला वगळता जडेजाने नाबाद 32 धावा, फाफ डु प्लेसिसने 25 धावा आणि मोईन अलीने 21 धावांचे छोटेखानी योगदान दिले होते. तथापि गोलंदाजांची योग्य साथ न मिळाल्याने चेन्नईला पराभव पत्करावा लागला.