कोलंबो: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना (IND vs SL 2nd ODI) आज कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर (Premadasa International Cricket Stadium, Colombo) खेळवला जाणार आहे. दुपारी अडीच वाजता हा सामना सुरु होईल. शुक्रवारी दोन्ही संघांमध्ये खेळवण्यात आलेला पहिला सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात भारताने श्रीलंका क्रिकेट संघाला केवळ 230 धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 75 धावांची भागीदारी करत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मानेही स्फोटक अर्धशतक झळकावले, पण असे असतानाही टीम इंडिया केवळ 230 धावांपर्यंतच मर्यादित राहिली. सामना बरोबरीत सुटल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसत होता. आता टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना उद्या खेळावला जाणार आहे.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 पासून खेळवले जातील. सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील, तर थेट प्रवाह Sony Liv वेबसाइट आणि ॲपवर उपलब्ध असेल. (हे देखील वाचा: IND vs SL 2nd ODI Weather Report: भारत-श्रीलंका दुसऱ्या वनडे सामन्यावर पावसाचे काळे ढग! मॅच होणार रद्द? जाणून घ्या पावसाची टक्केवारी)
After a nail-biting tie in the 1st ODI, what does the second match of the series have in store? 🏏 👀
Find out tomorrow LIVE on #SonySportsNetwork 📺 🤩#SLvIND #TeamIndia pic.twitter.com/6rrJPJVjwY
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 3, 2024
आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत एकूण 169 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत टीम इंडियाने 99 सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. दरम्यान, 2 सामने टाय झाले असून 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. पाहिले तर टीम इंडियाचा वरचष्मा राहिला आहे. मागील 6 एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने सर्व सामन्यांमध्ये श्रीलंकेला पराभूत केले आहे. श्रीलंकेने शेवटची वेळ 2021 मध्ये टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय सामना जिंकला होता.
दोन्ही संघांची अशी असू शकते प्लेईंग-11
भारतीय क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रियान पराग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
श्रीलंका क्रिकेट संघातील संभाव्य प्लेइंग 11: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समाराविक्रमा, चरिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेझ, अकिला धनंजय, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराज.