अबू धाबी (Abu Dhabi) येथे टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाने (Team Idnia) निर्धारित 20 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून 210 धावांचा डोंगर उभारला आहे आणि अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 2011 धावांचे विशाल टार्गेट दिले आहे. भारतासाठी रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वाधिक 74 धावा आणि केएल राहुलने (KL Rahul) 69 धावा केल्या. तसेच रिषभ पंत 27 आणि हार्दिक पांड्या 35 धावा करून नाबाद राहिले. अफगाणसाठी गुलबदिन नैब आणि राशिद खानने प्रत्येकी 1 विकेट घेतली. टी-20 विश्वचषकमधील ही यंदाची सर्वाधिक धावसंख्या आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)