पाकिस्तानात (Pakistan) माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना काल अटक झाल्यानंतर देशात त्यांच्या समर्थकांनी देशात हिंसात्मक निदर्शने केली. यामुळे संपुर्ण देशात सध्या दंगलसदृश्य वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका, इंग्लड आणि कॅनडा या देशांनी आपल्या नागरिकांसाठी ट्रव्हल अॅडव्हाझरी (Travel Advisory) जाहीर केली आहे. इस्लामाबाद येथील अमेरिकन दुतावासाने सध्या ते सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे सांगितले, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या सुरक्षेची काळजी करावी तसेच सोबत आपले ओळखपत्र ठेवावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत.
US, UK & Canada announce travel advisory for citizens amid ongoing protest in Pakistan #news #dailyhunt https://t.co/9lOxOxdRG5
— Dailyhunt (@DailyhuntApp) May 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)