Ugandan Farmer:  12 बायका आणि 102 मुले आणि 568 नातवंडे असलेल्या युगांडाच्या एका शेतकऱ्याने अखेर कुटुंबाची वाढ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 67 वर्षीय मुसा हसह्याने आता आपल्या पत्नींना गर्भनिरोधक वापरण्यास सांगितले आहे. मोठ्या कुटुंबामुळे होणाऱ्या आर्थिक चणचणीमुळे  मुसा हसह्याने हा निर्णय घेतला आहे. जेणेकरून त्यांना आर्थिक अडचण होणार नाही. माझे उत्पन्न वाढत्या खर्चामुळे कमी होत चालले आहे. मिस्टर हसह्या आणि त्यांचे कुटुंब युगांडातील लुसाका येथे राहतात.

हसह्या यांनी सांगितले की, त्याच्या सर्व बायका एकाच घरात राहतात जेणेकरून ते त्यांच्यावर 'लक्ष' ठेऊ शकतील. हसह्या यांची सुमारे एक तृतीयांश मुले, सहा ते ५१ वयोगटातील आहे. त्यांचा मोठा मुलगा त्यांच्या धाकट्या पत्नीपेक्षा २१ वर्षांनी मोठा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)