वॅगनर गट (Wagner Mercenary Group) द्वारा दावा करण्यात आला होता की, त्यांनी रशियाचे हेलिकॉप्टर पाडले आहे. आता या गटाने आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी या हेलिकॉप्टरचा फोटोही प्रसिद्ध केला आहे. वॅग्नर गटाच्या प्रमुखाने शनिवारी (24 जून) रोजी सांगितले की, त्यांनी रशियामध्ये प्रवेश केला आणि थेट लष्करी मुख्यालयावरच ताबा मिळवला. त्यांनी मॉस्कोचे लष्करी नेतृत्व उलथवून टाकण्याचीही भाषा केली आहे. तसेच, ते आणि त्यांचे 25, 000 सैनिक थेट मरायलाही तयार आहेत.
ट्विट
Wagner group releases photo of a Russian helicopter it claims to have shot down earlier today pic.twitter.com/xi9BUM34q3
— BNO News (@BNONews) June 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)