पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे वरिष्ठ नेते फैसल वावडा यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान इम्रान खान यांच्या जीवाला धोका आहे. खान यांची हत्या करण्याचा कट रचला गेला आहे. पाकिस्तानच्या एआरवाय न्यूजने याबाबत वृत्त दिले आहे. इम्रान खान यांना बुलेट प्रूफ शील्ड वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात संबोधित करताना त्यांना सावध राहण्यास सांगितले आहे. फैसलहे इम्रान खान यांच्या जवळछे मानले जातात. इम्रान खान राजकीय संकटाचा सामना करत असताना त्यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. त्यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले आहे. तत्पूर्वी इम्रान आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)