पाकिस्तानच्या राजकारणात उलथापालथ करणारी घटना आज घडली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाने एकमताने दिलेल्या निकालात, याधीचा डेप्युटी स्पीकरचा निर्णय घटनाबाह्य घोषित केला आहे. न्यायालयाने नॅशनल असेंब्लीच्या विसर्जनासह त्यानंतर उचललेली पावले चुकीची असल्याचे म्हटले आहे. तसेच न्यायालयाने 9 एप्रिल रोजी अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचा निर्णय दिला आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता पाक संसदेत मतदान होणार आहे. याआधी डेप्युटी स्पीकरने इम्रान खान विरुद्धचा अविश्वास ठराव रद्द करण्यासाठी असेम्ब्ली बरखास्त केली होती तसेच 90 दिवसांत निवडणुका घेण्याचे योजले होते.
A larger bench of the Supreme Court of Pakistan declares the deputy speaker’s ruling unconstitutional in a unanimous judgment. The court sets aside the ruling and the steps taken after it including the dissolution of the National Assembly: Pakistan's Samaa News pic.twitter.com/a4W7mtEPHb
— ANI (@ANI) April 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)