Train Derailed After Hitting Truck At Russia: दक्षिण रशियामध्ये आज मोठा रेल्वे अपघात झाला. 800 प्रवासी घेऊन जाणारी ट्रेन लेव्हल क्रॉसिंगवर एका ट्रकला धडकली. ज्यामुळे रेल्वे गाडी रुळावरून घसरली. या अपघातात किमान 140 लोक जखमी झाले तर दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. मॉस्कोच्या दक्षिणेला सुमारे 1,200 किमी (750 मैल) दक्षिणेकडील व्होल्गोग्राड प्रदेशात असलेल्या कोटेलनिकोवो स्टेशनजवळ सुमारे 65 किमी (40 mph) वेगाने ट्रेनने ट्रकला धडक दिली. या अपघात सुमारे 140 लोक जखमी झाले, असे रशियन रेल्वेने सांगितले आहे. तीन मुलांसह 15 लोकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने सांगितले की, अग्निशमन आणि बचाव कर्मचारी प्रवाशांना घटनास्थळावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)