पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना पाकिस्तानी न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. खान यांच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली असून, त्यांना जामीनही मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या तेहरिक ए एन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. पाकिस्तानमध्ये पुढच्या काही काळामध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील ही एक मोठी घटना आहे. ज्याचा या देशाच्या राजकारणावर दीर्घकाळ परिणाम होणार आहे.
ट्विट
BREAKING: Pakistani court has suspended the sentence of former PM Imran Khan and granted him bail
— The Spectator Index (@spectatorindex) August 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)