Imran Khan Convoy Accident: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वाहनांच्या ताफ्यातील एका कारचा अपघात झाला. या अपघातात वाहन उलटल्याने 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, तोशाखाना प्रकरणात इम्रान आज इस्लामाबाद कोर्टात हजर होणार आहे. अपघातानंतर इम्रान खान यांनी शाहबाज सरकारवर हल्लाबोल केला. सर्व प्रकरणांत जामीन मिळूनही पीडीएम सरकार मला अटक करण्याचा कट रचत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे इम्रान म्हणाले. सरकारचे दुर्भावनापूर्ण हेतू माहित असूनही, मी इस्लामाबाद आणि न्यायालयात जात आहे. कारण माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)