Elon Musk’s Net Worth: अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांचे सर्वात मोठे समर्थक एलॉन मस्क यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी (5 नोव्हेंबर), मस्कची एकूण संपत्ती 22.31 लाख कोटी रुपये होती, जी निकालानंतर एका दिवसात म्हणजेच 7 नोव्हेंबरला वाढून 24.58 लाख कोटी रुपये झाली. आता टेस्ला आणि स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती $300 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडून $300.3 बिलियनवर पोहोचली आहे. दुसरीकडे, टेस्ला इंक. ने शुक्रवारी $1 ट्रिलियन मार्केट कॅप परत मिळवले. ट्रंप यांच्या विजयानंतर कंपनीचे शेअर्स वाढत गेले. या आठवड्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मात्याचे शेअर्स 26.1% वाढले. अहवालानुसार, 8 नोव्हेंबर रोजी टेस्ला शेअर्स 3% वाढले आणि 296.95 वर बंद झाले. निवडणुकीच्या एक दिवस आधी 4 नोव्हेंबर रोजी ते $242.84 च्या पातळीवर बंद झाले. तेव्हापासून ते 21.92% पेक्षा जास्त वाढले आहे. यापूर्वी, कंपनीच्या मार्केट कॅपने ऑक्टोबर 2021, डिसेंबर 2021 आणि मार्च 2022 मध्ये $1 ट्रिलियनचा टप्पा ओलांडला होता. (हेही वाचा: Elon Musk’s xAI Hiring AI Tutors From India: एलॉन मस्कची कंपनी एक्स एआयमध्ये काम करण्याची संधी; भारतामधून केली जात आहे हिंदी ट्यूटरची भरती, जाणून घ्या पगार)
एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती 300 अब्ज डॉलरवर पोहोचली-
BREAKING: Elon Musk’s net worth has reached $300 billion —He said "My plan is to use the money to get humanity to Mars & preserve the light of consciousness" pic.twitter.com/BA3QcBa75J
— DogeDesigner (@cb_doge) November 8, 2024
Tesla Hits $1 Trillion Market Cap—Musk Becomes $300 Billion Man After Trump Winhttps://t.co/h2X7jO7RLO pic.twitter.com/BB4cN3jBF5
— Forbes (@Forbes) November 8, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)