Donald Trump: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार (US Presidential Election 2024)असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी वृत्तसंस्था रॉयटर्सला मुलाखत दिली. त्यात टेस्लाचे सीईओ एलोन मस्क(Elon Musk) यांना कॅबिनेट पद किंवा व्हाईट हाऊसमध्ये सल्लागाराची भूमिका देण्याचा विचार करत आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी उत्तरात म्हटले की, 'जर मस्क त्यासाठी तयार असतील तर निश्चित त्यांना कॅबिनेट पद देण्यात येईल'. नोव्हेंबरमध्ये यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 पार पडत आहे. विशेष म्हणजे, इलॉन मस्क यांनी यापूर्वी 2020 च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आपली भूमिका बदलत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्यानंतर इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना समर्थन दिले. (हेही वाचा: Donald Trump यांचं X वर 'कमबॅक'; Elon Musk सोबतच्या मुलाखतीपूर्वीचा व्हिडिओ प्रचाराचा भाग म्हणून पोस्ट)

पोस्ट पहा

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)