Donald Trump यांचं X वर 'कमबॅक'; Elon Musk सोबतच्या मुलाखतीपूर्वीचा व्हिडिओ प्रचाराचा भाग म्हणून पोस्ट
डोनाल्ड ट्रम्प यांनी यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी मुलाखतीचा एक व्हीडीओ प्रचाराचा भाग म्हणून पोस्ट करून X वर पुनरागमन केले आहे. डोनाल्ड ट्रम्पची X पोस्ट एलोन मस्क यांच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग आहे.
यूएस अध्यक्षीय निवडणूक 2024 साठी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)यांनी जोरदार तयारी केली आहे. नुकतच एक्सकडून त्यांच्यावरील बॅन हटवण्यात आलं. त्यानंतर प्रचाराचा भाग म्हणून एक नवीन व्हिडिओ त्यांनी X वर पोस्ट केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची X पोस्ट एलोन मस्क(Elon Musk) यांच्या मुलाखती पूर्वीच्या व्हिडीओची आहे. ज्यात ते 'मी राष्ट्राध्यक्ष असतानाची की आत्तांची तुमची स्थिती चांगली आहे? आमची अर्थव्यवस्था ढासळली आहे. आम्ही एक अधोगती असलेले राष्ट्र आहोत. अमेरिकेला पुन्हा सुरक्षित करा. अमेरिकेला पुन्हा मोठ बनवा,' असे ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क मंगळवारी X सोशल मीडिया नेटवर्कवर रिपब्लिकन अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची मुलाखत घेणार आहेत. त्या आधी व्हिडीओची जाहीरात प्रचाराचा भाग म्हणून वापरण्यात आली आहे. (हेही वाचा : PM Modi Condemns Attack On Donald Trump: 'राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही', डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या गोळीबाराचा पंतप्रधान मोदींकडून निषेध)
पोस्ट पहा
Are you better off now than you were when I was president?
Our economy is shattered. Our border has been erased. We're a nation in decline.
Make the American Dream AFFORDABLE again. Make America SAFE again. Make America GREAT Again! #TrumpOnX
— Donald J. Trump (@realDonaldTrump) August 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2024 08:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

