दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को विमान रशियन शहराकडे वळवल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व प्रवाशांना एअर इंडिया तिकीटाची संपूर्ण किंमत परत करेल. 6 जून रोजी संध्याकाळी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान क्रमांक AI173 च्या इंजिनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. यानंतर रशियातील मगदान विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 216 प्रवासी आणि 16 क्रू मेंबर होते.
पाहा ट्विट -
Air India to refund full ticket price to all passengers affected by diversion of Delhi-San Francisco flight to far east Russian port city
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)