AT&T Data Breach: काही दिवसांपूर्वी AT&T कंपनीने सांगितले होते की, त्यांच्या सुमारे 7 कोटी 30 लाख ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे. यामध्ये ग्राहकांच्या सामाजिक सुरक्षा क्रमांकाचाही समावेश आहे. एका गुप्त ऑनलाइन ठिकाणी (डार्क वेब) ही माहिती मिळाली आहे. ही माहिती कंपनीतून लीक झाली आहे की भागीदार कंपनीकडून हे अद्याप समोर आले नाही. लीक झालेली माहिती कदाचित 2019 किंवा त्यापूर्वीची आहे. यामुळे अंदाजे 76 लाख विद्यमान आणि 654 लाख माजी ग्राहक प्रभावित झाले आहेत. लीक झालेल्या माहितीमध्ये सामाजिक सुरक्षा क्रमांकासह, पत्ते, फोन नंबर आणि जन्म दिनांक यांचाही समावेश आहे. AT&T चे म्हणणे आहे की, त्यांच्या सिस्टममध्ये बाहेरील कोणीही घुसखोरी केलेली नाही. माहिती लीक झाल्यानंतर कंपनीने लाखो ग्राहकांचे पासवर्ड बदलले आहेत. (हेही वाचा: YouTube Videos Removed: यूट्यूबने भारतात तीन महिन्यांत हटवले तब्बल 22.5 लाख व्हिडिओ, दोन कोटी चॅनल्स बॅन)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)