मुंबई च्या बीकेसी भागामध्ये आज भारतातील पहिलं अ‍ॅपल स्टोअर खुलं करण्यात आलं आहे. टिम कूक यांच्या हस्तेच या स्टोअरचे दरवाजे ठीक 11 वाजता उघडले. स्टोअर उघडण्यापूर्वीच ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये एकाने चक्क 32 वर्षांपूर्वीचा Macintosh Classic हा अ‍ॅपलचा डेस्कटॉप आणला होता. ग्राहकाला इतक्या जुन्या मॉडेल सोबत पाहून टिम कूक देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्याची आपुलकीने चौकशी देखील केली. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.

पहा Tim Cook यांची प्राईजलेस रिअ‍ॅक्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)