चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. रोमहर्षक फायनलमध्ये भारत एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होता, त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या क्वार्टरमधील चौथ्या गोलमुळे भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान भारताने सामन्यात पुनरागमन केल्यानंतर वंदे मातरमच्या जयघोषाने स्टेडियम भरून गेलं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
The chants of Vande Mataram fill the stadium after India comes back into the game. #HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 pic.twitter.com/Mn5ccxSG4A
— Hockey India (@TheHockeyIndia) August 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)