Paris Paralympics 2024:  पॅरिस पॅरालिम्पिकचा आज दुसरा दिवस आहे. पहिला दिवस भारतासाठी खूप चांगला गेला. पुरुष आणि महिलांसह एकूण 8 भारतीय बॅडमिंटनपटूंनी त्यांचे पहिले सामने जिंकले. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती आणि तसेच झाले. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. भारताच्या अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. याशिवाय मोना अग्रवालने भारताला दुसरे पदक मिळवून दिले. मोना अग्रवालने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल एकेरीत कांस्यपदक जिंकले. अवनी लेखरा आणि मोना अग्रवाल यांच्यानंतर आता प्रीती पाल हिनेही कांस्यपदक पटकावले आहे. हे तिसरे पदक दुसऱ्या दिवशीच भारताच्या झोतात आले आहे. प्रितीने महिलांच्या 100 मीटर T35 प्रकारात वैयक्तिक सर्वोत्तम वेळ 14.21 सेकंदासह तिसरा क्रमांक पटकावला. यानंतर म

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)