सेरेना विल्यम्सच्या निवृत्तीच्या घोषणेतून टेनिस चाहते अजूनही पूर्ण सावरले नाहीत, अशात आता त्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पुरुष टेनिसमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने आपली व्यावसायिक कारकीर्द संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. फेडररने गुरुवारी जाहीर केले की, पुढील आठवड्यात होणारी लेव्हर कप ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची एटीपी स्पर्धा असेल आणि त्यानंतर तो कोणत्याही ग्रँड स्लॅम किंवा टूर स्पर्धेत भाग घेणार नाही.

ओपन एरामधील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून ओळखल्या जाणार्‍या, स्विस सुपरस्टारने त्याच्या दोन दशकांच्या व्यावसायिक कारकिर्दीत 20 ग्रँड स्लॅम एकेरी खिताब जिंकले. हा टप्पा गाठणारा तो जगातील पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याने पहिल्यांदा पीट सॅम्प्रासचा 14 ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडून इतिहास रचला. रॉजर फेडररने 28 जानेवारी 2018 रोजी ऑस्ट्रेलियन ओपनद्वारे शेवटचे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले. मात्र, त्यानंतर राफेल नदालने त्याचा विक्रम मोडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)