आशियाई क्रीडा 2023 च्या स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने इतिहास रचला आहे. तिसऱ्या दिवशीही चीनच्या भूमीवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला आहे. आणि याचे कारण म्हणजे तो खेळ ज्यामध्ये भारताने 41 वर्षांनंतर सुवर्णपदक जिंकले आहे. भारताने 1982 नंतर प्रथमच घोडेस्वारीत सुवर्णपदक जिंकले आहे. भारताकडून सुदीप्ती हाजेला, दिव्यकृती सिंग, हृदय छेडा आणि अनुष अग्रवाल या चौघांनी आश्चर्यकारक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. 1982 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर भारताने प्रथमच घोडेस्वारीत पदक जिंकले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत 14 पदके जिंकली आहेत. 3 सुवर्ण व्यतिरिक्त यात 4 रौप्य आणि 7 कांस्य पदकांचा समावेश आहे.
𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐈𝐂 𝐆𝐎𝐋𝐃 🥇 𝐅𝐨𝐫 𝐈𝐍𝐃𝐈𝐀 🇮🇳 𝐚𝐟𝐭𝐞𝐫 𝟒𝟎 𝐲𝐞𝐚𝐫𝐬
Equestrian 🏇 Anush, Hriday, Divyakriti and Sudipti wins Gold medal in Team Dressage event with 209.205 points.#Cheer4India #AsianGames2022 #IndiaAtAG22 pic.twitter.com/UU6AvwKLrs
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)