स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीत भारताला पहिले सुवर्ण पडल मिळवून दिले आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगचे हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. भारताला आतापर्यंत सात सुवर्णपदके मिळाली असून पदकांची संख्या 22 वर पोहोचली आहे. बजरंगने अंतिम फेरीत कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव केला. बजरंगने यापूर्वी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यावेळचे कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)