जागतिक क्रमवारीतील नंबर 1 महिला टेनिसपटू ऍश बार्टीने (Ash Barty) ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) उपांत्य फेरी सामन्यात अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा (Madison Key) 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला आणि स्पर्धेच्या फायनल फेरीत पहिल्यांदा धडक मारली. बार्टी सध्या आपला सर्वोत्तम खेळ करत असून सेमीफायनल सामन्यात तिने सुरुवातीपासून कीजवर वर्चस्व कायम ठेवले आणि अमेरिकन खेळाडूला आघाडी घेण्याची संधी दिली नाही.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)