राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीने बुधवारी भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान - मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी (Major Dhyan Chand Khel Ratna Award) 11 खेळाडूंची शिफारस केली आहे. यामध्ये टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा (Neeraj Chopra), रौप्य पदक विजेता कुश्तीपटू रवी दहिया (Ravi Dahiya), हॉकिपटू पीआर श्रीजेश (PR Sreejesh) आणि बॉक्सर लोव्हलिना बोरगोहेन या ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा समावेश आहे. याशिवाय स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्रीसह (Sunil Chhetri) ज्येष्ठ भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) हिलाही सर्वोच्च सन्मानासाठी शिफारस करण्यात आली आहे. छेत्री भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी शिफारस केलेला पहिला भारतीय फुटबॉलपटू ठरला आहे. 2021 हे भारतासाठी एक खास वर्ष होते जिथे टोकियो ऑलिम्पिक 2020 तसेच पॅरालिम्पिक (Paralympics) 2020 मध्ये अनेक खेळाडूंनी देशासाठी विक्रमी पदकांची कमाई केली.

पॅरालिम्पिक खेळात दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली पॅरालिम्पियन अवनी लेखरा हिचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच अर्जुन पुरस्कारासाठी 35 भारतीय खेळाडूंचीही शिफारस करण्यात आली आहे. अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या 35 खेळाडूंमध्ये भारताचा स्टार सलामी फलंदाज शिखर धवनचा (Shikhar Dhawan) समावेश आहे. यापूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये हॉकीमध्ये भारताच्या विक्रमी प्रदर्शनानंतर महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नावावर भारताच्या सर्वोच्च क्रीडा सन्मानाचे नाव बदलले होते. लक्षात घ्यायचे की ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांमुळे यंदाच्या क्रीडा पुरस्कारांची घोषणा पुढे ढकलण्यात आली होती. यामुळेच यंदा पुरस्कारांना उशीर झाला आहे. खेलरत्नसाठी एकाच वेळी इतक्या खेळाडूंची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी 5 खेळाडूंना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या वेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळाडूंनी या पुरस्कार नामांकनमध्ये दबदबा बनवला आहे.

खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केलेल्या 11 भारतीय खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे:

नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स)

रवी दहिया (कुस्ती)

पीआर श्रीजेश (हॉकी)

लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग)

सुनील छेत्री (फुटबॉल)

मिताली राज (क्रिकेट)

प्रमोद भगत (बॅडमिंटन)

सुमित अंतिल (भाला)

अवनी लेखरा (शूटिंग)

कृष्णा नगर (बॅडमिंटन)

एम नरवाल (शूटिंग)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)