Vijay Hazare Trophy 2022: तामिळनाडूचा फलंदाज नारायण जगदीशन (Narayan Jagadeesan) याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावून नवा विक्रम केला आहे. त्याचे हे सलग पाचवे शतक असून लिस्ट-ए क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. चालू असलेल्या सामन्यात अरुणाचल प्रदेशविरुद्ध 277 धावांची खेळी करून त्याने केलेल्या अनेक विक्रम केले आहेत. जगदीशनने अरुणाचलविरुद्ध 141 चेंडूत 277 धावांची खेळी खेळली होती. त्याने आपल्या खेळीत 25 चौकार आणि 15 षटकार मारले. विजय हजारेसाठी जगदीशनने या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात बिहारविरुद्ध 5 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने आंध्र प्रदेश (114), छत्तीसगड (107), गोवा (168) आणि हरियाणा (128) विरुद्ध सलग शतके झळकावली. त्याने चालू मोसमात आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये 159.80 च्या सरासरीने सर्वाधिक 799 धावा केल्या आहेत.

जगदीशनने पाच शतके झळकावून कोहलीचा विक्रम मोडला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या एकाच सत्रात पाच शतके झळकावणारा जगदीशन हा पहिला फलंदाज ठरला. एका मोसमात प्रत्येकी चार शतके झळकावणाऱ्या विराट कोहली, पृथ्वी शॉ, रुतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांना त्याने मागे टाकले आहे. याशिवाय जगदीशन लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतके झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सलग चार शतके झळकावणाऱ्या कुमार संगकारा, अल्विरो पीटरसन आणि पडिक्कल यांना मागे टाकले आहे.

तथापी, जगदीशन लिस्ट-ए मध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा फलंदाज ठरला. जगदीशनने आपल्या मॅरेथॉन शतकी खेळीत (277) भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवनचा विक्रमही मोडला आहे. तो आता केवळ भारताचाचं नाही तर लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात जगातील सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा खेळाडू बनला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)