FIFA विश्वचषक 2022-विजेता अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी भारतातील अनेकांसाठी सांताक्लॉज बनत आहे. या सांताक्लॉजकडून गिफ्ट मिळवणाऱ्या व्यक्तीचे सध्या सोशल मीडियावर भलतेच कौतुक होत आहे. ही भाग्यवान व्यक्ती दुसरीतिसरी कोणी नसून भारताचा माजी क्रिकेट कर्णधार, एमएस धोनीची कन्या झिवा धोनी आहे. झिवा धोनीने आपल्या अधिकृत इंस्टा अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लिओनल मेस्सीची स्वाक्षरी असलेली अर्जेंटीनाची जर्सी दाखवताना दिसते. दरम्यान, यापूर्वी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह आणि माजी भारतीय क्रिकेटपटू प्रज्ञान ओझा यांनी मेस्सीकडून ऑटोग्राफ केलेली जर्सी घेतली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)