IND vs SA ODI Series 2023: टीम इंडियाला (Team India) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) तिन्ही फॉरमॅटसाठी संघ जाहीर केला आहे. त्यानंतर आता टीम इंडियाला तिन्ही फॉरमॅटमध्ये तीन कर्णधार मिळाले आहेत. याशिवाय टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाजही बऱ्याच कालावधीनंतर संघात परतला आहे. होय, आम्ही बोलतोय युझवेंद्र चहलबद्दल (Yuzvendra Chahal). बऱ्याच दिवसांपासून संघात स्थान न मिळाल्याने चहल सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. या स्पर्धेत चहल हरियाणासाठी शानदार गोलंदाजी करत आहे. चहल बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता आणि 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते. आता भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 4th T20: सूर्यकुमार यादव ग्लेन मॅक्सवेलचा मोठा विक्रम मोडणार, फक्त चौथ्या टी-20 सामन्यात करावे लागेल हे काम)

पाहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)