India National Cricket Team vs Pakistan National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा पाचवा सामना रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारी रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs PAK) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा ग्रुप अ चा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, पाकिस्तानची कमान मोहम्मद रिझवान यांच्या खांद्यावर आहे. दरम्यान, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने 63 चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 1 षटकार लागला आहे. विराट कोहली 92 चेंडूत 81 धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये 100 धावांची भागीदारी झाली आहे. भारताचा स्कोर 2025/2
FIFTY & Counting!
A solid half-century this from Shreyas Iyer 💪
2⃣0⃣0⃣ up for #TeamIndia in the chase!
Live ▶️ https://t.co/llR6bWyvZN#PAKvIND | #ChampionsTrophy | @ShreyasIyer15 pic.twitter.com/vZMRWGALcc
— BCCI (@BCCI) February 23, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)