India vs England 2025: भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे. 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे. हा दौरा आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025ची तयारी म्हणूनही पाहिला जात आहे. पहिला सामना नागपुरात खेळला जाईल. त्यासाठी टीम इंडिया नागपूरमध्ये पोहोचली आहे. त्यावेळी भारतीय क्रिकेटपटूंना जवळून पाहण्यासाठी अनेक चाहते जमले होते. खेळाडूंच्या संरक्षणासाठी ड्युटीवर असलेले पोलिस सर्वाची कडक तपासणी करत होते. त्यावेळी पोलिसांनी अनेकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी भारताचा थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघू (Throwdown specialist Raghu) याला पोलिसांनी टीम इंडीयाचा चाहता समजून त्याची अडवणूक केली. त्यावेळी त्याला थांबवण्यासाठी 3-4 पोलीस आले होते. मात्रष ओळख पटल्यानंतर पोलिसानी त्याला टीमकडे रवाना. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.(National Games 2025: 15 वर्षीय Jonathan Anthonyची कौतुकास्पद कामगिरी; Sarabjot Singh आणि Saurabh Choudhary यांना मागे टाकत एअर पिस्तूलमध्ये पटकावले सुवर्णपदक)
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)