भारतीय संघ (Team India) शनिवारी ब्रिस्बेनला पोहोचला आहे जिथे त्यांना सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. सरावाच्या वेळी काही मुले मैदानावर खेळतानाही दिसली. त्यापैकी एक 11 वर्षांचा मुलगा द्रुशील चौहान होता. या मुलाची गोलंदाजी आणि त्याच्या अ‍ॅक्शनने भारतीय कर्णधार इतका प्रभावित झाला की तो ड्रेसिंग रूममधून बाहेर आला आणि किट घालून नेटमध्ये खेळायला गेला. या मुलाने येथे रोहित शर्मालाही (Rohit Sharma) गोलंदाजी केली. BCCI ने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच ट्विटरवर रोहित शर्मा आणि त्या मुलाचा फोटो शेअर करत संपूर्ण व्हिडिओची लिंकही पोस्ट केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)