भारतीय क्रिकेट संघाच्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनची पुन्हा कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत 3-0 असा ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर धवनच्या नेतृत्वाखाली युवा ब्रिगेड झिम्बाब्वेमध्ये त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल. अपेक्षेप्रमाणे कर्णधार रोहित शर्मासह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

पहा संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसीध कृष्णा, मोहम्मद सिराज , दीपक चहर.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)