IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकासोबत बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळवला जात आहे. दोन्ही संघाच्या टी-20 वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर टीम इंडिया 10 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकानं आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे दोन्ही संघानां आज जगज्जेते होण्याची सुवर्णसंधी आहे. तत्तपुर्वी, भारताने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 176 धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराजने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. आता दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 177 धावा करायच्या आहेत. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेला पाहिला धक्का लागला आहे. दक्षिण आफ्रिका संघाचा स्कोर 7/1
WT20 2024. WICKET! 1.3: Reeza Hendricks 4(5) b Jasprit Bumrah, South Africa 7/1 https://t.co/HRWu74Stxc #T20WorldCup #SAvIND #Final
— BCCI (@BCCI) June 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)