आशिया कप 2023 ची (Asia Cup 2023) तारीख जाहीर झाली आहे. यावेळी आशिया कप केवळ पाकिस्तानातच नाही तर श्रीलंकेतही खेळवला जाणार आहे. आशिया चषक 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. 4 सामने पाकिस्तानात आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. पीसीबीने आशिया कपसाठी हायब्रीड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला होता. श्रीलंका हे तटस्थ ठिकाण आहे जिथे भारत आपले सामने खेळेल. भारत-पाकिस्तानचे (IND vs PAK) सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. (हे देखील वाचा: IND vs WI 2023: उमरान मलिक वेस्ट इंडिज दौऱ्यावर करु शकतो पुनरागमन, अर्शदीप सिंगला कसोटी संघात मिळू शकते संधी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)